सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक सुयोग पंडित यांच्या ‘सुक्या सुंगटाची कढी’ कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न…!
⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची ही पहिली कादंबरी असून उद्योजक व साहित्यिक रुजारीओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला….
