Headlines

‘कुडाळेश्वर’ ची २२ पासून सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धा…

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने बक्षीस रकमेत भरघोस वाढ:दोन टप्प्यात होणार स्पर्धा.. ⚡कुडाळ ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रामध्ये दि. २२ सप्टेंबर पासून हि स्पर्धा सुरु होणार असून, यंदा या स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने…

Read Full News

बारामती येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळचे घवघवीत यश…

वक्तृत्व स्पर्धेत पृथ्वीराज एकले आणि एलविना फर्नांडिस प्रथम.. कुडाळ : बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेज बारामतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या लेक्स कनेक्ट या लॉ फेस्ट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधांमध्ये कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यास संपादन केले.या स्पर्धे अंतर्गत पोस्टर…

Read Full News

कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे तडतडीने निकाली…

३८ लाख १३ हजाराची वसुली.. कुडाळ : आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी यांच्या हस्ते…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची नाहक बदनामी थांबवा…

वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवळे यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळेची आणि जीवाची कोणतीही पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा दिली जात आहे. त्यामुळे या रूग्णालयरूपी मंदिराची नाहक बदनामी नको, अशी हाक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सावंतवाडीकरांना दिली आहे. जुन्या मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या या रुग्णालयात जिल्हा…

Read Full News

खासकीलवाडा शाळेच्या दीडशे वर्षपूर्ती निमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा…

माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन: अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे.. ⚡सावंतवाडी ता.१३-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक चार, खासकीलवाडा ही ऐतिहासिक शाळा यंदा दीडशे वर्षांची सुवर्णकामगिरी साजरी करत आहे. या अविस्मरणीय पर्वानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला. याच वेळी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात आली असून, तिच्या अध्यक्षपदी सर्वानुमते…

Read Full News

‘ओंकार’ हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरात स्थिरावला…

वनविभाग कर्मचाऱ्यांसह जलद कृती दल परिसरात ठाण मांडून:गोवा वनविभागाचे पथकही तैनात.. ⚡बांदा ता.१३-: दोडामार्ग – तिलारी परिसरातून ओंकार हत्ती आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे. नेतर्डे – धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. दोडामार्ग घोटगे, मोर्ले भागातून कळणे,…

Read Full News

*भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: “फादर ऑफ इंजिनियरिंग” भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन यावर्षीही भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११ वा.बीकेसी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकामचे नि.कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित…

Read Full News

योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्यावतीने रोणापाल येथील वसतीगृहाला जीवनावश्यक वस्तूचे वितरण…!

⚡सावंतवाडी ता.१३-: समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या भावनेतूनच या समाजसेवी संस्था सर्वत्र कार्य करत असतात. अशाच स्वयंसेवी संस्थापैकी मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास वर्षभर पुरेल…

Read Full News

प्रा. सौ.कविता तळेकर यांना मुंबई विद्यापिठाची पी.एचडी. प्राप्त…!

⚡सावंतवाड ता.१३-:श्री पंचम खेमराजमहाविद्यालय सावंतवाडी (हिंदी विभागाच्या) प्रा. सौ.कविता तळेकर यांनी हिंदी विषयात मुंबई विद्यापीठाची पी.एचडी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ‘डॉ. नासिरा शर्मा संवेदना एवं शिल्प’ या विषयावर संशोधन केले. त्यांना प्रा. डॉ अनिल कुमार सिंग (प्राचार्य, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर व प्रभारी अधिष्ठाता मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता मुंबई विद्यापीठ मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले….

Read Full News

१७ दिवसांच्या गणरायाच सावंतवाडीत थाटामाटात विसर्जन…

⚡सावंतवाडी ता.१३-: शहरातील १७ दिवसांच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत वाजत गाजत निरोप देण्यात आला. गणेशभक्तांच्या जल्लोषात लड्याक्या बाप्पाचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य व पालखीतून निघालेली बाप्पाची स्वारी विसर्जन मिरवणूकचे खास आकर्षण ठरली. शहरात १७ दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. देव नरसोबा गणेशोत्सव…

Read Full News

You cannot copy content of this page