Headlines

मोती तलावाकाठी मोठ्या कंचराकुंड्या बसवा…

नगरसेविका ॲड.सायली दुभाषी यांची प्रशासनाकडे मागणी ; छोट्या कचराकुड्यामुळे स्वच्छतेचा बोजबारा… ⚡सावंतवाडी ता.१४-:शहरातील मोती तलावा काठी नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छोट्या कचराकुंड्यातील कचरा फूटपाथवर पसरत असल्याने सकाळच्या वेळी मॉर्निंग वाॅकला येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो एकूणच या प्रकारामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना म्हणून मोठ्या कचराकुंड्याचा वापर करावा अशी…

Read Full News

शिंदे शिवसेनेकडून उपनगराध्यक्षपदासाठी उद्या अजय गोंदावळे उमेदवारी अर्ज दाखल करणार…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती शिंदे शिवसेनेच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भाजप–शिंदे शिवसेना युतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसला तरी, शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सध्या…

Read Full News

साहित्यिक वैशाली पंडित यांच्या लेखनात कोणाचेच अनुकरण नाही…

कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर:मालवणात साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथासंग्रहाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात.. ⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे ११ जानेवारी २०२६ रोजी ‘आगिनझाडची पंचविशी’ हा विशेष सोहळा संपन्न झाला. मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ ह्या कथासंग्रहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली यानिमित्त हा विशेष ‘रौप्यपर्व पूर्ती…

Read Full News

जिद्दीच्या जोरावर ‘निरवडे’चा पियुष बर्डे झाला ‘अग्निवीर’…

​ ⚡​सावंतवाडी,ता.१३-: निरवडे येथील पियुष बर्डे या युवकाने भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून स्थान पटकावले आहे त्याच्या या यशाने केवळ निरवडे गावाचेच नव्हे, तर संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.​पियुषचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याने एका प्रशिक्षण अकॅडमीतून भरती प्रक्रियेचे प्राथमिक धडे गिरवले होते. मात्र, अकॅडमीतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा काळ त्याच्यासाठी खऱ्या…

Read Full News

उपनगराध्यक्ष निवडीत नगराध्यक्षांचे कणकवलीवरील बेगडी प्रेम उघड…

माजी उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांचा आरोप:टप्प्याटप्प्याने पोलखोल करण्याचा इशारा.. ⚡कणकवली ता.१३-:उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे कणकवली गावावरील बेगडी प्रेम कणकवलीकरांनी अनुभवले, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला. भाजपने गावऱ्हाटीमधील मानकरी व्यक्ती राकेश राणे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली असताना, निर्णायक मताचा वापर करून आमच्या…

Read Full News

कळसुली येथील श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिरात १४ जानेवारी रोजी हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१३-: तालुक्यातील कळसुली श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिर, भोगनाथवाडी, येथे दरवर्षीप्रमाणे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी हरिनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता घटस्थापना व आरतीने होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्रामस्थांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी ७ वाजता श्री देव भोगनाथ विद्यामंदिर, कळसुली नं….

Read Full News

“पूर्वसूचना न देता तिलारीच्या उपकालव्यात पाणी सोडले…

बांदा शहरात पूरसदृश स्थिती: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. ⚡बांदा ता.१३-: तिलारीच्या बांदा उपकालव्याची साफसफाई व किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आल्याने बांदा शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले असून शेती, भाजीपाला, पिके, घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये…

Read Full News

रत्नागिरीत २२ जानेवारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव..

कोकणातील नागरिकांना आली संधी ; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग.. ⚡कणकवली ता.१३-:महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर कोकणभूमीला पुन्हा एकदा अध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श लाभणार…

Read Full News

वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे श्री विशाल परब व सौ वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी गवंडळकर उत्तम कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभाप्रसंगी राजकीय आणि सामाजिक…

Read Full News

मालवण लायन्स क्लबकडून अंध अपंग बांधवांसाठी अन्नदान सेवा उपक्रम…

⚡मालवण ता.१३-:अंध अपंग बांधवांसाठी दैनंदिन जीवनातील कामकाजात आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने आयोजित कार्यशाळे दरम्यान मालवण लायन्स क्लब तर्फे अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात आला. या अन्नदान सेवाकार्यासाठी लायन्स क्लबच्या सदस्या…

Read Full News

You cannot copy content of this page