गरोदर माता गर्भसंस्कार बाबत मळेवाड आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०९-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गोवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार, ९ मार्च रोजी विशेष ‘एएनसी (ANC) आणि स्त्रीरोग आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गोवा येथील डॉ. स्वाती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम मस्के , डॉ.अदिती ठाकर ,युवासेना प्रमुख सागर नाणोसकर,मदन मुरकर उपस्थित होते .

केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या गोवा येथील संस्थानच्या ‘स्त्रीरोग प्रसूतीतंत्र’ विभागाद्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि सुरक्षित मातृत्व याला प्राधान्य देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी डॉ. स्वाती गायकवाड यांनी सदरील शिबिराबाबत माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले .

युवा सेनेचे सागर नाणोसकर यांनी सुद्धा या शिबिराबाबत गौरवोद्गार काढून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गोवा यांच्या मार्फत गावा गावात शिबिर लावून येथील नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा मानस असल्याचे सांगितले.

या आरोग्य शिबिरात गरोदर मातांची (ANC) आणि इतर महिलांच्या विविध स्त्रीरोगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच शिबिरातन आशा स्वयंसेविकांसाठी विशेष आरोग्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गर्भधारणेदरम्यान योग्य आहार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थी महिलांना मोफत आयुर्वेदिक औषध किटचे वाटप करण्यात आले.
या शिबिरासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा व तज्ज्ञांचा सल्ला मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड चे यू.टी. राणे यांनी केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page