महिलांसाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शन वर्गांचे करण्यात आले होते आयोजन..
⚡सावंतवाडी ता.०९-: महिला दिनाचे औचित्य साधून धाकोरे शाळा नं. १ येथे विविध स्पर्धा व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर धाकोरे गावच्या स्नेहा मुळीक , बचत गटांच्या सीआरपी श्रीम. प्रभुराळकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार , धाकोरे गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर उपाध्यक्ष रवींद्र मुळीक उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका प्रेरणा गोवेकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत ,महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याची अनेक उदाहरणे व दाखले दिले.
श्रीम.राळकर यांनी महिलांचा व्यक्तिमत्व विकास कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली.
महिलांसाठी उखाणे स्पर्धा , संगीत खुर्ची, रस्सीखेच व इतर फनी गेम्स अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर शिक्षिका प्रेरणा गोवेकर व सहाय्यक शिक्षक सोनल जाधव यांच्या सहकार्याने केले.
