*मळेवाड येथील अपघातात दुचाकीस्वार जखमी…

⚡सावंतवाडी ता.०९-: मळेवाड (सावळवाडी) येथे आज सकाळी साडेआठ च्या सुमारास घडलेल्या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.

आज सकाळी कोंडुरे येथील दुचाकी स्वार आपल्या दुचाकी वरून , मळेवाड वरून शिरोड्याच्या दिशेने जात असताना, मळेवाड सावळवाडी येथील वळणावर आले असताना गाडीचा ब्रेक लागल्यामुळे अचानक गाडी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या डंपरवर आदळली.यामुळे दुचाकीवर असलेले औदुंबर बाबुराव खोत(४६) व त्यांचा मुलगा अथर्व औदुंबर खोत (१०) हे जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी त्यांना लागलीच मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.त्यांच्यावर मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अदिती ठाकूर व डॉ.विक्रम मस्के यांनी प्रथमोचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले.

You cannot copy content of this page