उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध:चार वर्षांनंतर निवड प्रक्रिया पार..
सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा. गटविकास अधिकारी यशवंत गवस व कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्या उपस्थितीत ही निवडण प्रक्रिया पार पडली.
पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड तब्बल ४ वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर पार पडली. भाजप ६, शिवसेना ६, अपक्ष ५ व उबाठा शिवसेना १ असं बलाबल होत. सभापती पद आरक्षित असल्याने शिवसेनेच्या वाट्याला ही जागा सुटली. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पं.स. सदस्या शिवसेनेच्या सुस्मिता जाधव सभापती पदी बिनविरोध निवडून आल्या. तर उपसभापती पदी याच मतदारसंघातील भाजपचे पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक बिनविरोध ठरले. सभापती व उपसभापती पदासाठी केवळ एक- एक अर्जच दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे पंचायत समिती सावंतवाडीला २४ वा सभापती तर ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत. महायुतीचा झेंडा पंचायत समितीवर फडकला असून नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी यावेळी पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, सदाशिव राणे, महेश धुरी, धनश्री मराठे, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, नेहा कांबळी, जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडीचे प्र. नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप युवा नेते विशाल परब, विनोद राऊळ, जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे, मायकल डिसोजा, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, आदींसह शिवसेना, भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
