Headlines

शहरात वाढलेल्या भिकाऱ्यांवर निर्बंध आणा, सीसीटीव्ही चालू करा…

चोरीच्या पार्श्वभूमीवर बांदा भाजपा शिष्टमंडळाची मागणी.. ⚡बांदा ता.२८-: शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर व वाढलेल्या भिकाऱ्यांच्या प्रमाणावर निर्बंध आणावेत याकरीता बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने बांदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पालवे यांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत निवेदन सादर केले. यात शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अज्ञात व्यक्तींमुळे बांदा बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी व नागरिकांना…

Read Full News

भारतीय किसान संघच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:सकारात्मक विचार करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शेतकऱ्यांच्या गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी (२७ रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन संघाच्यावतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर करून या प्रश्नांकडे तातडीने लक्ष…

Read Full News

बालदशावतार नाट्यप्रयोगाने रंगला जि. प . शाळा मठ कणकेवाडी नं.३ चा सांस्कृतिक सोहळा…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्हा परिषद मठ कणकेवाडी नं.३ शाळेत आयोजित करण्यात आलेला वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपारिक दशावतार नाट्यप्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्कार, गीत, एकपात्री अभिनय तसेच सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले “वैष्णव उद्धार” हे दशावतारी नाटक…

Read Full News

सावंतवाडीत १४-१५ मार्चला ‘वैश्यवाणी प्रिमिअर लीग…

⚡सावंतवाडी ता.२८-: हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून वैश्य वाणी प्रिमिअर लीगच आयोजन १४ व १५ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी दिली. सावंतवाडी शहर मर्यादीत ही क्रिकेट स्पर्धा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्यावतीने या क्रिकेट लीगच आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक २५ हजार…

Read Full News

सावंतवाडीत ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात : डिजिटल युगात मराठी संवर्धनाची शपथ…

यशवंतराव भोसले बी फार्म काॉलेजच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी,ता.२८-:मराठी भाषेच्या गौरव आणि संवर्धनाच्या उद्देशाने यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे आज ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या आचार्य चरक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना होती — “मराठी भाषेचे संवर्धन – काळाची गरज”. आधुनिक आणि डिजिटल युगात मराठीचे स्थान अधिक भक्कम करण्याचा…

Read Full News

सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्ष पदासाठी वेंगुर्ला – रेडीचे प्रितेश राऊळ रेसमध्ये…

⚡वेंगुर्ला ता.२८-: जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाची निवड 16 मार्च रोजी होणार आहे. याबाबत शासनामार्फत शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून वेंगुर्ला तालुक्याला अध्यक्ष पदासाठी पुन्हा प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातून महायुतीतर्फे रेडी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले भाजपचे प्रितेश शंकर राऊळ…

Read Full News

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्यावतीने कळसुलीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

⚡कणकवली ता.२७-: कळसुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ तसेच कळसुली दिंडवणे प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी आणि आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून गेली अनेक…

Read Full News

मामा वरेरकर नाट्यगृहच्या असुविधांवरून रंगकर्मी संतप्त…

नगरपालिकेला निवेदन:स्वच्छता, खुर्च्या, एसी दुरुस्ती व देखभालीसाठी कायम कर्मचारी नियुक्तीची केली मागणी.. ⚡मालवण ता.२७-:मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहातील असुविधांबाबत आमने सामने नाटकाच्या कलाकारांनी व्यक्त केलेली नाराजी मान्य असली तरी याबाबत सोशल मीडियावर रिल्स बनवून नाट्यगृहाची व मालवणची केलेली बदनामी मालवणातील आम्हा रंगकर्मींसाठी संतापजनक आहे. मालवणचे मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणसह जिल्ह्यातील कलाकारांसाठी एक मोठे सांस्कृतिक केंद्र…

Read Full News

मालवण येथे १ मार्च रोजी शासकीय योजनांचे महाशिबीर…

⚡मालवण ता.२७-:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती, मालवण, जिल्हा मुलकी व पोलीस प्रशासन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर रविवारी, १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे….

Read Full News

आंबा बागायतदार व व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट…

शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा :मालवणातील आंबा व्यवसायिकांची मागणी.. ⚡मालवण ता.२७-:हवामानातील बदलांमुळे व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामात आंबा फळाचे मोठे नुकसान होऊन आंबा बागांचे अपेक्षित उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले असल्याने आंबा बागायतदार शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन बिकट परिस्थिती झाली आहे, त्यामुळे आंबा बागायतदारांना तातडीची नुकसान भरपाई मिळावी, कर्ज गोठविण्यात यावे, कर्ज माफी…

Read Full News

You cannot copy content of this page