आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि सीईओ यांची भेट…

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.त्याचबरोबर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक गावात पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी दुपारी १२ वाजता…

Read More

चौकुळ चुरणीचीमुस वाडीतील प्रत्येक घराला प्रेशर कुकर भेट…

रोटरी क्लबचा उपक्रम:पूर्ण वाडी विकसित करण्याचा घेतला निर्णय.. ⚡सावंतवाडी ता.२९-: रोटरी क्लब, सावंतवाडीने चुरणीचीमुस – चौकुळ येथील ही एक वाडी पुर्ण विकसित करण्याचा चंग बांधला आहे. यापुर्वी या वाडीतील रहिवाशी आणि भगिरत ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातुन बायोगगॕस बांधुन अलीकडेच सुपुर्द करण्यात आले. आणि त्यांची गरज लक्षात घेऊन बायोगगॕसच्या उदघाटनासाठी आलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट -3170 चे गव्हर्नर…

Read More

अमित सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी अमित गोपाळ उर्फ बाळा सावंंत (38) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमित यांची प्रकृती अलीकडे ठिक नव्हती. मंगळवारी राहत्या घरी त्यांना अवस्थ वाटू लागले. त्यांना येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासाअंती त्यांचे निधन झाले होते. अमित यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात वडील,…

Read More

वीजेची समस्या न सुटल्‍यास आंदोलन तीव्र छेडणार…

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचा इशारा; कणकवलीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक ⚡कणकवली ता.२९-: अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यात व्यापारी वर्गाचे व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्‍या पाच दिवसांत सर्व वीज समस्या सोडविण्याची कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने देण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्‍हा वीज ग्राहक संघटनेचे…

Read More

पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना हजारो झाड तोडली…

परशुराम उपरकर यांचा आरोप;सर्व्हे करून दोषीवर कडक कारवाई करण्याची उपरकरांची मागणी.. सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना इको सेन्सिटिव्ह झोन मधील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत तसेच कणकवली तालुक्यातील वरवडे पिसेकामते या इको सेन्सिटिव्ह भागात सुद्धा रस्ता काम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली असून त्यांचा सर्व्हे करून…

Read More

शुभम बांदेकरची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड…

⚡सावंतवाडी ता.२९-: येथील शुभम विठ्ठल बांदेकर याची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रीस व उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण झाले. त्यानंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पूर्ण केली. पणजी येथे भारतीय तटरक्षक…

Read More

स्वामी समर्थ मंदिराच्या कलाशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२९-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठा येथे त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलाशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.दरम्यान सायंकाळी उशिरा इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला देखील कीर्तन प्रेमींनी मोठी गर्दी उसळून मोठा आनंद लुटला.

Read More

वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसूल आल्याने खळबळ…

सावंतवाडी : वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसूल आल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा मानवी आहे की प्राण्याचा हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत असून उद्या दुपारपर्यंत याच निदान होणार आहे. ही हाडे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.वेत्ये रोडवर असलेल्या एका धाब्या शेजारी हाडांच तुकडे…

Read More

होडावडा कस्तुरबावाडी येथील तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

⚡वेंगुर्ले ता.२८-:वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर, वय 38 वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खोलीतील लाकडी बाराला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये तुळशीदास बाबू होडावडेकर, वय 61 वर्षे यांनी म्हटले…

Read More

जिल्ह्यात बसवण्यात येणारे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे…

अँड.संदीप निंबाळकर:लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन आंदोलन उभारणार.. सावंतवाडी ता.२८-: शासनाने प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे धोरण आखले असून लवकरच हे मीटर जिल्ह्यात बसवण्यात येणार आहे हे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे ठरणार आहे त्यामुळे या शासनाच्या धोरणाला जनतेने संघटितपणे विरोध उभा केला पाहिजे यासाठी लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन…

Read More
You cannot copy content of this page