दोडामार्गमध्ये दिव्यांगाना स्वयंचलित सायकल वाटप

जी प सभापती डॉ अनिशा दळवी, उपसभापती लक्ष्मण नाईक यांची उपस्थिती

*💫दोडामार्ग दि.७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीषद,समाजकल्याण विभाग मार्फत राबविण्यात येणारी अस्थिव्यंग व्यक्तींसाठी १.३ स्वयंचालीत तीन चाकी सायकल साहित्य खरेदी २०२०/२१ या योजनेअंतर्गत लाभार्थीने खरेदी केलेल्या तीन चाकी गाडीचे वितरण सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती सौ.अनिशा शैलेश दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य तथा मा.उपसभापती लक्ष्मण नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी श्री.शंकर शिवाण्णा आडकी यांचेकडे गाडीच्या चाव्या सुपूर्द करुन पंचायत समिती दोडामार्ग येथे करण्यात आले. यावेळी भाजपा दोडामार्ग तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,घोटगे सरपंच संदीप नाईक,कोनाळ सरपंच पराशर सावंत,मांगेली मा.सरपंच सुर्यनारायण गवस,पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री.डिसोजा,पंचायत समिती समाजकल्याण विभागाचे श्री.वझरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page