देशव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटना सहभागी

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता २६ केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण, कामगार, शेतकरी, विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या आजच्या संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती संघटना सहभागी झाली असून कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती संघटना सहभागी झाली असून याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरकर ,प्रशांत आडेलकर,संजय जाधव,राजाराम पवार,अनंत सावंत,समीर परब, आदि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. या निवेदनातून त्यांनी सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सरसकट १०० टक्के अनुदान द्यावे, व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरा, सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा ,२० पटाच्या आतील शाळा बंद करू नका, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बाल संगोपन रजा द्या, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा, अशा विविध मागण्या निवेदनातून केल्या आहेत . या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सादर केले.

You cannot copy content of this page