सावंतवाडी तहसील कार्यालयात सोमवारी झाली होती कारवाई
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* ऐपतीचा दाखला देण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वारंग याला 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ऐपतिचा दाखला देण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग ( वय 52 , सध्या रा. आनंदवन सोसायटी सालईवाडा, सावंतवाडी, मूळ रा.वारंगाची तुळसुली, कालेलकरवाडी कुडाळ) यांनी 4 हजार लाच मगितली होती.याबाबत तक्रारदार महिलेने अँटी करप्शन कडे दाद मागितली होती. वारंग याला 4 हजार रुपयांची लाच घेताना 5 एप्रिल रोजी अँटी करप्शन ने रंगेहाथ पकडले होते. आज वारंग याना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी.आर.कदम यांनी 9 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
