मेढा चौकचार मांड उत्सवात कोरोना निर्मूलनासाठी सांगणे…

पूर्ण जगाचे संकट दूर होवो अशी केली प्रार्थना

मालवण (प्रतिनिधी) “बा देवा म्हाराजा, सगळ्यांच्या जीवार उठलेल्या ह्या कोरोना विषाणूचो नायनाट कर, कोरोनामुळा जी काय सगळ्यांच्या पाठी इडापीडा लागली हा ती दूर कर आणि भारत देशाबरोबरच जगावर इलेल्या ह्या कोरोना महामारीचा संकट लवकरात लवकर संपव रे म्हाराजा” असे गाऱ्हाणे मेढा येथील चौकचार मांड उत्सवात वाडेकऱ्यांच्यावतीने चौकचार चरणी घालण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा चौकचार मांड उत्सव साध्या पद्धतीने व वाडा मर्यादित साजरा करण्यात आला. यावेळी चौकचार घुमटी फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. चौकचारची पूजाअर्चा केल्यानंतर दिवसभर वाड्यातील नागरिकांनी दर्शन घेत नवस बोलले व फेडले. तर रात्री परंपरागत घुमट वादन आणि कलावंतीण गायन कार्यक्रम पार पडला. गायन कार्यक्रमास प्रफुल्ल गोसावी (हार्मोनियम) व अवधूत पारकर (तबला) यांची संगीतसाथ लाभली. यावेळी चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेतर, माजी नगरसेवक बाळू तारी, संतोष तारी, आपा मोराजकर, विनायक मोरजकर, विनायक मेतर, अरुण आढाव, अभय कदम, राजू वाघ, भूषण मेतर, गोट्या आढाव, हनु वायंगणकर आदी व इतर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाडामर्यादित व नियम पाळून हा उत्सव पार पडला.

You cannot copy content of this page