सोनवडे तर्फ कळसुली येथील राणे कुटुंबियांच भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सांत्वन…

⚡ओरोस ता.२८-: दोन दिवसांपूर्वी राधानगरी येथे झालेल्या अपघातात कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आज राणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले,

यावेळी मृत मुलांचे वडील चंद्रकांत राणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करत या अपघाताची सखोल चौकशीसाठी आपण राधानगरी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करणार असल्याची माहिती देत राणे कुटुंबियांचे सांत्वन केले.

You cannot copy content of this page