*💫मालवण दि.०५-:* आदर्श रक्तदाते मुकेश बावकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांचे वैयक्तिक ५० वे रक्तदानाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित रक्तदान शिबिरात मालवण तहसीलदार अजय पाटणे आणि मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते वेळोवेळी रक्तदान शिबिरे यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल मालवण येथील एकता मित्रमंडळाला आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्विकारताना एकता मित्रमंडळाचे सदस्य विद्याधर मेस्त्री, अमेय देसाई , हितेंद्र हिर्लोस्कर , सुहास संगोडकर , केदार देसाई , मुकेश जी बावकर , महेश अंधारी , राजा शंकरदास , संदीप पेडणेकर , राजेंद्र बिडये , आतू फर्नांडिस , विकास पांचाळ आदी उपस्थित होते.
एकता मित्रमंडळ आदर्श सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित…
