जिल्ह्यात यावर्षी ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी….

सतीश सावंत यांची माहिती

सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्ह्यात यावर्षी उच्चाकी भात खरेदी झाली आहे. ८२ हजार २५९ क्विंटल ही खरेदी झाली असून जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल २१ कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी दिली. याबाबत बोलताना बँक अध्यक्ष सावंत यानी, २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ३६ हजार क्विंटल भात खरेदी झाली होती. यावर्षी तब्बल ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी झाली आहे. यावर्षी शासनाने २ हजार ५६८ रुपये क्विंटल असा भाव दिला होता. यासाठी जोरदार प्रचार प्रसिद्धि करण्यात आली होती. जिल्ह्यात ७० ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. २१ कोटी रूपयांची ही खरेदी झाली आहे. यातील मार्च महिन्यात झालेली खरेदी वगळता पूर्वीच्या भात खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. केवळ मार्च महिन्यातील पैसे जमा व्हायचे आहेत, असे यावेळी सावंत म्हणाले. पुढे बोलताना सावंत यानी, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यानी चांदा ते बांदा योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. यांत्रिकीकरण सामग्री पुरविली. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादन वाढले आहे. आ वैभव नाईक यानी भात खरेदीसाठी लागणारी बारदाने उपलब्ध केली. पालकमंत्री उदय सामंत व पणन मंत्री बाबासाहेब पाटील यानी सहकार्य केले. या सर्वांचे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो, असे सांगितले.

You cannot copy content of this page