ओरोस येथे २७, २८ जुलै रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा…

⚡कणकवली ता.२०-: योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २७ आणि २८ जुलै रोजी ओरोस जिजामाता हॉस्पिटल येथे पाचवी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा सब जुनियर (१० ते १४ वर्षे), ज्युनियर (१४ते १८ वर्षे), सीनियर (१८ ते २८ वर्षे), सीनियर ए (२८ ते ३५ वर्षे), बी (३५ ते ४५ वर्षे), सी (४५ ते ५५ वर्षे) अशा सहा गटांमध्ये होणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आधार कार्ड झेरॉक्स, बोनाफाईड प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो व जोखीम प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे आणावीत. इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस डॉ. तुळशीराम रावराणे (कणकवली) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page