कणकवली बसस्थानकावर आढळला मृतदेह…

कणकवली : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-मांगलेवाडी येथील अरविंद श्रीपतराव अडसुळे(६५) यांचा मृतदेह कणकवली एस.टी.बस स्थानकावर आढळून आला. याबाबतची माहिती श्रीपतराव अडसुळे यांनी पोलिसात दिली आहे.

मयत अरविंद श्रीतपराव अडसुळे हे रोड-रोलरवर चालक म्हणून काम करतात. दहा-बारा दिवसापूर्वी ते राधानगरी येथील मुळ गावी गेले होते. आज सकाळी ११.३० वा.च्या सुमारास येथील बसस्थानकावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

You cannot copy content of this page