भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.१९-: भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण येथे भाजपच्या बैठकीत जाहीर केले. यापूर्वी मालवण शहर प्रभारी म्हणून विजय केनवडेकर हे कार्यरत होते. मात्र, यामध्ये बदल करीत मालवण शहरअध्यक्ष पदी बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे.

मालवण भाजपची बैठक आज मालवण येथील भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उपस्थित राहून मालवण शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची नियुक्ती जाहीर केली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, जगदीश गांवकर, जॉन नरोना, महेश मांजरेकर, बबलु राऊत, आबा हडकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, अमिता निव्हेकर, राजु आंबेरकर, बबन परुळेकर, महेश सारंग, राजु बिडये, नंदू देसाई, नारायण धुरी, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर, सहदेव साळगावकर, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, दिलीप सांगवेकर, निलेश लुडबे, आप्पा मोरजकर, राजा मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रभाकर सावंत म्हणाले, भाजप सारख्या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद भाजपच्या सुवर्णकाळात भूषविण्यास मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळास आज एक वर्षे पूर्ण होत असून वरिष्ठानी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे लाभलेले सहकार्य यासाठी आपण सर्वांचे ऋणी आहोत, असेही सावंत म्हणाले. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात खास. नारायण राणे यांच्या रूपाने करून भाजपचा खासदार निवडून आणला, पदवीधर आमदार निवडणुकीतही भाजपचा आमदार निवडून आणला, त्याचप्रमाणे आता मालवण कुडाळ मतदारसंघात आपल्या हक्काचा आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. त्यासाठी संघटित राहून आतापासूनच काम करूया, असेही प्रभाकर सावंत म्हणाले.

यावेळी नियुक्तीनंतर बोलताना बाबा मोंडकर यांनी माझ्यावर शहरअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, येत्या नगरपालिका निवडणुकीत मालवण नगरपालिका ताब्यात घेण्यास भाजप सक्षम आहे, भाजपला आणखी मजबूत करण्यासाठी एक दिलाने काम करूया, असे सांगितले. यावेळी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, पूजा करलकर, धोंडी चिंदरकर यांनीही विचार मांडले.

You cannot copy content of this page