पेट्रोल वाहतूक करणाऱ्या कॅन्टर व अशोक लॅलेन्ट टेम्पो यांच्यात बावळट तिठा येथे अपघात…

टेम्पो चालक गंभीर जखमी ; उपजिल्हा रुग्णालयात
जखमीला हलविले..

सावंतवाडी ता.१९-: गोव्याला मेडिकल साहित्य घेऊन जाणाऱ्या अशोक लॅलेन्ड टेम्पो व पेट्रोल वाहतूक करणारा आयशर कॅन्टरमध्ये दाणोली – बावळाट तिठा जवळ वळणावर भिषण अपघात झाला आहे. दरम्यान अशोक लॅलेन्ट टेम्पो मधील चालकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून गंभीर जखमी झाला.

चालक आतच अडकून पडला असता सामाजिक सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत याच्यासह दोणीली वाहतुक पोलिस यांनी अथक प्रयत्नाने त्याला बाहेर काढले. व तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविले. घटनास्थळी सावंतवाडी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

You cannot copy content of this page