सावंतवाडी ता.१८-: भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाला आज प्रभाकर सावंत यांच एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याबद्दल आता येणाऱ्या विधानसभेत देखील त्यांच्या हातून चांगलं काम घडो व विधानसभेत देखील भाजपला चांगलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यश मिळो अशी सदिच्छा देखील श्री परब यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, रवी मडगावकर, आनंद नेवगी, राजू बेग, प्रमोद कामत, श्वेता कोरगावकर,संतोष नानचे, प्रथमेश तेली, सत्यवान बांदेकर,उदय नाईक, हनुमंत पेडणेकर, विनोद सावंत, मंदार कल्याणकर, महेश धुरी, उत्कर्षा सासोलकर,दिपाली भालेकर, रेश्मा सावंत, राजन गिरप सचिन बिरजे आदी उपस्थित होते.
