धक्का मित्रमंडळातर्फे कुडाळकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण मधील धक्का मित्रमंडळ या सेवाभावी ग्रुपतर्फे मालवण वायरी येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल मधील गरजू ११ मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

या मदती बद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर यांनी धक्का मित्रमंडळाचे आभार मानले. यावेळी धक्का मित्रमंडळाचे देवा तोडणकर, हेमंत शिरगांवकर, नितेश जाधव, भूषण पिसे, गौरेश कांबळी, विशाल आपकर, नितीन कोटीयान, संजय गावडे, अनिकेत चव्हाण, रोहित चव्हाण, बाबू डायस, शंकर पाटकर, राहुल केळूसकर तसेच शाळेचे शिक्षक अजय शिंदे, शिल्पा साटम, सारिका शिंदे, महादेव नाईक, प्राची परब, शर्मिला गावकर, दर्शना गुळवे, अशोक आठलेकर, दिनेश खोत, संदीप बाने आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page