⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची आज सावंतवाडी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या समावेत भेट देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका अनोरोजीन लोबो, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेविका दिपाली सावंत, आदी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
