जिल्ह्यातील नुकसानीला प्रशासनासह महामार्ग ठेकेदार जबाबदार…

परशुराम उपरकर:जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने भरपाई देण्याची मागणी..

⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ व ८ जुलै रोजी झालेल्या पावसात राष्ट्रीय महामार्गालगतची घरे, शेतीमध्ये पाणी घुसून जे नुकसान झाले त्याला महामार्ग ठेकेदार व प्रशासन जबाबदार आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तविला असतानाही परजिल्ह्यातील अनेक अधिकारी येथे उपस्थित नव्हते. तर गेल्या पाच वर्षांपासून महामार्गाचा ठेकेदार देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली राहिलेली ६० टक्के रक्कम घेण्याचे काम करीत आहे. मात्र, त्याने महामार्गाबाबत भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक केलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार, जिल्हाधिकारी यांनी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परशुरामउपरकर म्हणाले, पाणी तुंबले तेव्हा महामार्गावर पावसाचे राजकीय पुढाऱ्यांनी नेहमीप्रमाणे तेथे जाऊन केली. मात्र, गेल्या फोटोबाजी पाच वर्षांपासून महामार्गाचा ठेकेदार हा देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली राहिलेली ६० टक्के रक्कम घेण्याचे काम करीत आहे. ४०० कोटींचा महामार्ग १६०० कोटींवर गेला. ठेकेदाराने २५ टक्के काम केले असून, असलेल्या समस्यांकडे नाही. वास्तविक सध्या उद्भवत तो लक्षच देत महामार्ग कामामध्ये नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधिंचेही त्याकडे लक्ष नाही. जिल्हाधिकारी यांना २४जूनला आम्ही पत्र दिले होते. यामध्ये पावसाळ्यात कुठे पाणी तुंबते, अपघात कुठे होतात, ठेकेदाराने कुठे काम केलेले नाही, याची सर्व माहिती दिली होती. जिल्हाधिकारी यांनी त्याबाबतचे पत्र कार्यकारी अभियंता यांना व कार्यकारी अभियंता यांनी ते पत्र उपअभियंता यांना पाठविले होते. पण, कार्यवाही काहीच झाली नाही. वास्तविक तुंबणारे पाणी हे नजीकच्या ओहोळ किंवा नदीला सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी २०१९ पासून होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहेत.

महामार्गाबाबतच्या अडचणी सोडवाव्यात

पावसाळी कालावधीत जिल्हाधिकारी यांचा आपत्कालीन विभाग कार्यरत होतो. यामध्ये बांधकाम व महसूल विभाग यांची भूमिका महत्त्वाची असते. पण, या विभागांचे परजिल्ह्यातील बहुतांश अधिकारी हे शुक्रवारी येथून जातात व सोमवारी जिल्ह्यात परत येतात. परिणामी काही दिवसांपूर्वी पाणी तुंबले तेव्हा हे अधिकारी येथे नव्हते. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे अधिवेशनात येथील कोणताही प्रश्न नसताना केवळ बजेटमधून पैसे आणण्याच्या नावाखाली गेले दोन आठवडे मुंबईत आहेत. वास्तविक हवामान खात्याने पावसाबाबत अंदाज वर्तविला होता. अशावेळी या अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडलेच कसे? त्यांनी मुख्यालय सोडल्यामुळेच जिल्ह्यात ही हालत झाली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून महामार्गाबाबतच्या अडचणी सोडवाव्यात, असेही उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page