⚡मालवण ता.१३-:
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल मध्ये साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवून तसेच कथा सांगून मार्गदर्शन करण्यात आले.
बागवे हायस्कुलमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामालेची शाखा सुरु करण्यात आली. यावेळी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. कथामालेची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. यानंतर कथा मालेचा उद्देश, आनंददायी शनिवार मध्ये अभ्यास न करणाऱ्या, अपुरा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग कसा घेता येणार नाही, याची माहिती मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सौ. कोदे यांनी आदर्श कथाकथनाचा नमुना कसा असावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवत कथा सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुक्तपणे पेटी वादन करण्यास, शिकण्यास वेळ दिला गेला. त्यानंतर एक देशभक्तीपर कन्नड गीत शिकवून व पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शिक्षक श्री. पाताडे, शिक्षिका सौ. भोगले, कुमारी जाधव यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
