कुडाळ न. पंचायतमधील सफाई कर्मचारी निघाले देवदर्शनासाठी…

कुडाळ न. पं. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे सौजन्य..

कुडाळ, प्रतिनिधी

आमदार वैभव नाईक आणि कुडाळ नगरपंचायतमधील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या सौजन्याने कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचारी यांची पंढरपूर, अक्कलकोट आणि शिर्डी या ठिकाणी देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली. या सहलीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यामध्ये विलास मुणगेकर, दिलीप मा. कदम, सुनीता कुडाळकर, रमेश देऊलकर, सतीश जाधव,
राजन कदम, धोंडी बिबवणेकर, दिलीप बु. कदम, संतोष नेरुरुकर, सुवर्णा जाधव, सुचिता जाधव आणि आरती धामापूरकर या १२ जणांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ पदाधिकारी अतुल बंगे, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्याना शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page