न्या. जी. ए. कुलकर्णी:विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी, नागरिक यांच्याशी साधणार संवाद;कुडाळमध्ये न्यायाधीशांचा पत्रकारांशी संवाद..
⚡कुडाळ ता.१३-: कायद्याचे नीट पालन आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर लोकांपर्यंत तो कायदा पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी कुडाळचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जी.ए. कुलकर्णी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. पोलीस, वकील, पंचायत समिती आणि पत्रकार यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून लोकांपर्यंत कायदा पोहोचविण्यासाठी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा झाली.
कायदा आणि त्याचे पालन करणे या दोन्ही गोष्टीत समन्वय साधून तो अमलात आणला तर सर्वानाच ते सोयीचे होणार आहे. पण आजकाल कायदा तोडण्याकडे लोकांचा कल दिसतो. वाहतूक सुरक्षा न पाळणे, त्या संबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन करणे.अशा गोष्टी लोकांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. त्यामुळे याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. या बाबत चर्चा करण्यासाठी कुडाळचे प्रथम वर न्याय दंडाधिकारी जी .ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांना निमंत्रित केले होते. यावेळी कुडाळचे सह दिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एन. एस. गवंडी, न्यायालयीन कर्मचारी रामचंद्र सावंत, पत्रकार प्रमोद ठाकूर, रवी गावडे, अजय सावंत, प्रमोद म्हाडगूत, निलेश जोशी उपस्थित होते.
न्याय यंत्रणेमार्फ़त कायदे जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम दर महिन्याला घेतले जाणे अपेक्षेत आहेत. जेणेकरून लोकांमध्ये कायद्याप्रती जनजगृती होईल. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी कुडाळ बस्थानकात पोलीस आणि विधी समिती कुडाळ यांच्या वतीने रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम घेण्यात आला. अशेच कार्यक्रम कुडाळ तालुक्यात शाळा-महाविद्यलायत घेतले जातील असे न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी सांगितले. आज ऑनलाईन व्यवहारात लोकांची फसवणूक होत आहे. अल्पवयीन मुलांच्याबाबत लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोक्सो कायद्याबाबत शाळा-महावियालयात जाऊन त्याविषयी विद्यार्थ्यां माहिती देणे, ८ ते १२ वर्षातील मुलांना कायदा समजावून सांगणे, चांगला-वाईट स्पर्श याविषयी त्यांना अवगत करणे, वाहतुकीचे नियम समजावून दाणे असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
न्याय यंत्रणा, वकील, पोलीस, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक आणि पत्रकार याना सोबत घेऊन अशाप्रकारचे कार्यक्रम राबविणायत येतील असे न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी सांगितले. शहरी भागा सोबतच ग्रामीण भागात देखील हा संवाद कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पोलीस, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर पंचायत मुख्याधिकारी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असे न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी सांगितले.
