मळगाव येथे कारवाई: ८६,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त..
⚡सावंतवाडी ता.१२-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर मळगाव येतील अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना रायगड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटे 4.45 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 86,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
कृष्णा गर्जे रा.रायगड असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.
