उमेदवार केसरकरच.. आम्हाला ठरावाची नाही गरज…

राजन पोकळे यांचा टोला; सावंतवाडी अशांत करण्याचा राजन तेलींचा प्रयत्न..

⚡सावंतवाडी ता.१२-: आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मंत्री दीपक केसरकर यांनाच उमेदवारी मिळणार आहे ही काळा दगडावरची रेघ आहे त्यामुळे कोणी कितीही ठराव केले तरी ही आम्हाला फरक पडत नाही आणि केसरकर यांच्या उमेदवारीसाठी आम्हाला ठराव घेण्याची गरज नाही असा टोला माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी लगावला.दरम्यान राजन तेली ज्यावेळी कणकवलीत होते त्यावेळी कणकवली अशांत होती आता ते सावंतवाडी अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र येथील जनता शांतता प्रिय असून त्यांचा जनताच हाणून पाडेल असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.

ते पुढे म्हणाले केसरकर- राणे यांचे संबंध आता अगदी चांगले आहे. लोकसभेच्या निकालानंतर राणें कुटुंबियांनी देखील केसरकर यांचे कौतुक केले होते. त्यामुळे ते पाहुण तेली अस्वस्थ झाल्यात त्यामुळे ते नहाक केसरकारांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सावंतवाडीतील जनता ही सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत देखील केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असतील व तेच अधिक जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास आहे श्री पोकळे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान रुपेश राऊळ यांनी केलेले आरोप वर आम्ही लक्ष देत नाही ते विरोधक म्हणून ते त्यांचं काम करतच राहतील त्यामुळे आम्ही त्यांची फार दखल घेत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.

You cannot copy content of this page