त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू…

अर्चना घारे परब:माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद..

⚡सावंतवाडी ता.१२- : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची तात्काळ पाठपुरावा करू असे आश्वासन राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आज ते उपस्थित ग्रामस्थांना दिले.दरम्यान
घारे यांनी आज ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील हॉटेल व्यवसायिक यांच्याशी सुद्धा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार राऊळ,
संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, दिगंबर मालटकर आदी. उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की पूल तात्काळ दुरुस्त करणे संदर्भात तसेच पुलाच्या बोगस कामाबाबत योग्य ती चौकशी होणेसंदर्भात आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावू असे आश्वासन सौ.घारे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले

You cannot copy content of this page