वेंगुर्ला प्रतिनिधी- रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात ‘वीर अभिमन्यू‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाटकात दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, गौरव शिर्के, बाबली नाईक, उदय कोनसकर, प्रशांत मयेकर, बाळू कोचरेकर, बंटी कांबळी, पुरूषोत्तम खेडेकर, शिवा मेस्त्री, उदय मोर्ये, मंगेश साटम आदी दिग्गज कलाकार भूमिका साकारणार असून यांना संकेत कुडव, निखिल निकम, बाबू कोरगांवकर आदी कलाकार संगीत साथ करणार आहेत. या नाटकासाठी १०० रूपये तिकिट मूल्य ठेवण्यात आले आहे. तिकिट विक्री नाईक अॅग्रो एजन्सी, सिद्धिविनायक प्लाझा, राऊळवाडा, वेंगुर्ला येथे सुरू आहे. तरी नाट्यरसिकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
