युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुका मिलिंद साटम यांच्या प्रयत्नाना यश..
⚡देवगड ता.११-: ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय येजा करणे शक्य होत नाही त्यामुळे कुवळे भरणी तांबळवाडी कुवळे या मार्गावर शालेय फेरी सुरू कराव्या अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत होती याची गंभीर दखल शिवसेना युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी घेत विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याकडे करत सदर फेरी तत्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती. या मागणीला अखेर यश येत सदर फेरी सुरू केल्याने विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट कमी झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भरणी गावातील मुलांना शाळेत येण्याकरीता एसटी बसची सुविधा नाही. शाळा सुटल्यानंतर सांयकाळी कणकवली आगाराची कणकवली कुवळे बस मुलांच्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध आहे.
सकाळच्या वेळी मुलांना येण्यासाठी आपली देवगड आगारातून स. ६.२० वाजता सुटणारी देवगड रेंबवली ही बसफेरी कुवळे परबवाडी येथुन व्हाया भरणी तांबळवाडी मार्गे परत रेंबवली अशी करावी.
ग्रामीण भागात एसटी बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे परिणामी काही खाजगी वाहतुकीने प्रवास करावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे ही गैरसोय दूर करून विद्यार्थ्यांना एसटी बसची सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुकाप्रमुख मिलिंद साटम माजी सभापती अमित साळगावकर यांनी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती.अखेर मागणीला यश येऊन आठ जुलैपासून सदर फेरी या मार्गावर सुरू करण्यात आली असल्याने पालक विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Show quoted text
