अन्नपूर्णा नदीवरील दहिबाव कोटकामते पुलाला मंजुरी;…

अर्थसंकल्पात ५ कोटी २५ लाखाच्या निधीची तरतूद ;पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न..

देवगड (प्रतिनिधी)१० जुलै २०२४

देवगड तालुक्यातील दहिबाव कोटकामते या गावांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील पूलाला अखेर चालू अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.५ कोटी २५ लाखाच्या भरीव निधी या पुलासाठी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले.
देवगड तालुक्यातील दहिबाव कोटकामते या गावाला जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील पूल व्हावा. यासाठी १९९२ पासून आपले सातत्याने या पुलासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू होता. मात्र यावर्षी चालू अर्थसंकल्पा मधून या पुलासाठी सुमारे ५ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या पुलामुळे देवगड तालुक्यातील आठ ते नऊ गावांना याचा फायदा होईल. त्याचबरोबर आचरा, मालवण, कणकवली, हे अंतर देखील दहा ते बारा किलोमीटर कमी होऊन प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल.पुलाला मंजुरी मिळाल्यामुळ दहिबाव पंचक्रोशीतील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहेत.अशी माहिती भाजप नेते सदाशिव ओगले यांनी दिली.

You cannot copy content of this page