१८ जुलै पासून कृषी उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन…

ओरोस ता १०
केंद्र शासन पुरस्कृत मॅनेज संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी व कृषी संलग्न पदविका, पदविधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागरिकांसाठी कृषी उद्योग प्रशिक्षणाचे १८ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात कृषी व कृषी संलग्न पर्यावरण, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फूड टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, मुक्त विद्यापीठाचे कृषी पदवीधर, पदवीधारक, बारावी नंतर पीक विज्ञान, पीक उत्पादक, हॉटी, पशू विज्ञान, कृषी इत्यादी शैक्षणिक पात्रात प्राप्त असलेले ६० वर्षाखालील सहभागी होवू शकतात. हे ४५ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण राहणार असून यात कृषी पूरक व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख पासून एक कोटी रुपयांपर्यंत नाबार्ड कडून कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर ३६ ते ४४ टक्के अनुदान मिळणार आहे. एस सी, एस टी प्रवर्गाला ४४ टक्के अनुदान राहणार आहे. इच्छुक नागरिकांनी सिंधुदुर्गनगरी येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत ८५५२९५९७०४, ८३०८२००४३२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन नोडल अधिकारी गजानन चौगुले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page