वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघाने घेतली भेट:वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची अशोक साळुंके यांची ग्वाही..
⚡कुडाळ ता.०९- : सिंधुदुर्ग जिल्हयासाठी महावितरणचे नूतन अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी आज पदभार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांनी त्यांचे वीज स्वागतही केलं. पण खरतर त्यांचे स्वागत जिल्ह्यातल्या ग्राहकांच्या तक्रारीवे आणि महावितरणबाबत वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींनी झाले. या तक्रारीचा साळुंके साहेबांवर अक्षरशः पाऊसच पडला. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वीज पुरवठा कसा सुरळीत राहणार याची काळजी घेईन आणि जास्तीत जास्त तक्रारी दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न कारेन अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी दिली.
अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची बदली झाल्यांनतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता म्हणून अशोक साळुंके यांनी आजच पदभार हाती घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी संघटना यांच्या वतीने आज त्यांचे स्वागत करण्यात आले
. यावेळी वीज ग्राहक संघटटनेच्या वतीने नंदन वेंगुर्लेकर यांनी त्यांना जिल्ह्यात महावितरणच्या वीज ग्राहकांची नेमकी काय परिस्थिती आहे याची पुरेपूर आणि अभ्यासपूर्ण रीतीने जाणीव करून दिली. सदोष मीटर दुरुस्त करा, आंब्रडचा गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला विषय मार्गी लावा, 30 ते 40 हजार वीजखांब स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत ते वीजखांब जीर्ण झाले आहेत, तसेच वाहिन्यासुद्धा जीर्ण झाल्या आहेत, त्या तात्काळ बदला, काही शाळांच्या मैदानात वीजखांब उभे केले आहेत ते काढा, जिल्ह्यातले ५० ट्रान्सफॉर्मर बदलण्याची गरज आहे, ते बदला, एका ट्रान्सफॉर्मरवर नेमका किती लोड द्यावा ते निश्चित करा, जुन्या ट्रान्सफॉर्मरचा सर्व्हे करा, वाढीव वीज बिलांचा प्रश्न निकाली काढा, तुमचे कर्मचारी फोन उचलत नाहीत, उचलले तर दादागिरीची भाषा करतात त्यांना समज द्यावी, सीएफसी सुरु करावीत, जिल्ह्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांच्या हिटलिस्टवर आहेत, त्यांना समज द्यावी, जिल्ह्यात ४२ मेगावॉट वीज तयार होते ती जिल्ह्यातच पुरवठा करावी, अशा कित्येक मागण्या आणि तक्रारी वीज ग्राहक संघटनेच्या आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने मांडण्यात आल्या.
दरम्यान या तक्रारींची आपण दखल घेतली असून त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना श्रीराम शिरसाट, व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष.प्रसाद पारकर, नंदन वेंगुर्लेकर..नितीन वाळके..राजन नाईक द्वारकानाथ घुऱ्ये..नितीन तयशेटे, संजय भोगटे, प्रमोद आरोस्कर..शार्दुल घुर्यें. आनिकेत सामंत..दीपक पटेकर..गोविंद सावंत.. संजय लाड..संजय सावंत..आबा मुंज, तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता अभयसिंह दिनोरे, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे आणि कर्मचारी उपस्थित होते.
