वागदे ग्रा पं च्या वतीने १२ वि उत्तीर्ण मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण…

कणकवली : वागदे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील १२ वि उत्तीर्ण झालेल्या १० विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युवराज बोराडे, लक्ष्मण घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते. शासकीय नोकरीसाठी अनिवार्य असलेला एम एस सी आय टी हा संगणक कोर्स वागदे ग्रामपंचायत द्वारे विद्यार्थ्यांना talex अकॅडमी येथे पूर्णतः मोफत शिकविण्यात आला. संगणकीय ज्ञानासोबत आजच्या युगात आवश्यक असलेले आयटी ज्ञान या कोर्सद्वारे मुलांना शिकता आले याबद्दल सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांनी सरपंच संदीप सावंत यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page