नट वाचनालयाला २५ हजार रुपयांची देणगी…

हस्ताक्षर स्पर्धा घेण्यासाठी अंकुश माजगावकर यांचा उपक्रम..

⚡बांदा ता.०६-: शालेय स्तरावर मराठी भाषा हस्ताक्षर स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी येथील नट वाचनालयाला रोख पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली..

श्री माजगावकर हे नट वाचनालयाचे आश्रयदाते आहेत. त्यामुळे त्यांचे वडील (कै.) रामचंद्र विठ्ठल माजगावकर व आई (कै.) सौ. सीताबाई रामचंद्र माजगावकर यांच्या स्मरणार्थ इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन शालेय गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

श्री माजगावकर यांनी नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्याकडे देणगीची रक्कम सुपूर्द केली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते. श्री माजगावकर हे नट वाचनालयला नेहमीच आर्थिक स्वरूपात व पुस्तक स्वरूपात देणगी देत असतात. त्यांच्या या दातृत्वाचे अध्यक्ष श्री सावंत यांनी आभार व्यक्त केले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत यांच्याकडे देणगी सुपूर्द करताना अंकुश माजगावकर. सोबत राकेश केसरकर, निलेश मोरजकर व इतर.

You cannot copy content of this page