Headlines

जय गणेश इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. या शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

या परीक्षेमध्ये जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मधील इयत्ता पाचवीचे ३० विद्यार्थी तसेच आठवीचे १७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पाचवीचे १५ विद्यार्थी व आठवीचे १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये
रोहित विठ्ठल डिचोलकर – इ. ५ वी (जिल्ह्यात ५० वा), केतकी रामकृष्ण गावकर -इ. ५ वी (जिल्ह्यात ५५ वी), मीरा संजय वराडकर – इ. ५ वी (जिल्ह्यात ६० वी), अर्थव प्रसाद वालावलकर -इ. ८ वी (जिल्हयात ४४ वा) या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व प्रविष्ठ, उत्तीर्ण, पात्र तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page