केसरकरांनी मायनिंग बाबतची भूमिका जनतेसमोर जाहीर करावी…

मायकल डिसोजा: पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकल्प आम्ही उधळून लावू..

⚡सावंतवाडी ता.०६-: आजगाव भागात मायनिंग प्रकल्प च्या हालचाली सुरू झाले आहेत त्यामागे श्री केसरकरच आहेत का..?आणी ते जर नसतील तर
मायनिंग प्रकल्पाला विरोध करून दाखवावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

दरम्यान पर्यावरणाला घातक ठरणारा प्रकल्प केसरकर यांच्या मतदारसंघात येत असताना आता केसरकर यांची भूमिका काय असणार हे त्यांनी आता जनतेसमोर जाहीर करावे असे आव्हान ही श्री डिसोजा यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की या भागातील लोकांच्या शेतजमीवर नांगर फिरवायचा आणि त्या भागात हानिकारक प्रकल्प आणायचे आणि आपल्या निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे आणि हे पैसे जनतेला वाटायचे आणि निवडून यायचं असा त्यांचा फंडा आहे का आणि हा फंडा जर असेल तर आम्ही तो उधळून लावू असा इशाराही डिसोजा यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page