सावंतवाडीची जागा शिवसेनेला मिळावी …

पक्षश्रेष्ठींकडे रूपेश राऊळ यांची आग्रही मागणी; पक्षाचा आदेश आला तर महाविकास आघाडी म्हणून काम करणार..

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेलाच मिळावा व स्थानिक उमेदवारच असावा अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली.

दरम्यान वरिष्ठांचा आदेश आला तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करू परंतु हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा व स्थानिक उमेदवार असावा अशी आम्ही मागणी काल देखील माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली असल्याचे देखील श्री. राऊळ यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page