Headlines

अर्बन बँकेच्या संस्थापकांच्या तस्वीरी मानाने पोहोचवा

समीर वंजारी:बँकेच विलीनीकरण होत असताना मनाला अतिव दुःख होतय…

⚡सावंतवाडी ता.०४-: गेल्या 77 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सावंतवाडी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे मुंबई येथील ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय मतदानातून झाला असून या बँकेच्या नावाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे त्यामुळे ह्या बँकेत झटणाऱ्या या बँकेमध्ये लावण्यात आलेल्या संस्थापकांच्या तस्वीरी सन्मानाने त्यांच्या निवासस्थानी पोचवाव्यात अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि सावंतवाडी अर्बन बँकेचे सभासद समीर वंजारी यांनी केली आहे.

समीर वंजारी हे फोंडाघाट वैश्य समाज पतसंस्थेचे ही संचालक आहेत. कोकणात सहकार रुजत नाही हे याचे उदाहरण असून सावंतवाडी अर्बन बँक विलीनीकरण करणे ही काळाची गरज असली तरी किमान सहा महिने अगोदर याबाबतची माहिती सभासदांना द्यायला हवी होती ही बँक कोणत्या अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या काळामध्ये रसातळाला जाण्यास सुरुवात झाली याचीही माहिती सभासदांसमोर येणे गरजेचे होते असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

दरम्यान सावंतवाडी अर्बन बँकेचे सुरुवातीपासूनचे संचालक
संस्थापक-अनंत कोरगावकर उर्फ (आना),विष्णु बांदेकर, मधुसुदन रांगणेकर, मधुसुदन पोकळे, विष्णु वामन नाईक उर्फ दाजी रेडकर,तत्कालीन व्यवस्थापक मॅनेजर – चंद्रकात काणेकर, तत्कालीन चेअरमन वामनराव कामत यांच्या तस्वीरी त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी मानाने सुपूर्त कराव्यात यावेळी दिलगिरी पत्र किंवा माफी पत्र देऊन संस्थापकांचे तस्वीरी परत करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे 77 वर्षीय या सहकारी बँकेचे बँकेची आपले गेले 40 वर्षे आत्ममियतेचे संबंध होते
त्यामुळे ही बँक विलीनीकरण होत असताना मनास अतिव दुःख होत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे

You cannot copy content of this page