अध्यापक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे 14 जुलै रोजी सत्कार…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे रविवार दिनांक १४ जुलै २०२४ या दिवशी सकाळी ९.३०वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे येथे माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा, या परीक्षेत उत्तीर्ण माध्यमिक कर्मचारी पाल्यांचा व शंभर टक्के निकाल लागलेल्या माध्यमिक शाळांचा ,निवृत्त शिक्षक सभासद आणि तालुक्यातील नूतन मुख्याध्यापकांचा अशा एकत्रित गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी संबंधित विद्यार्थी, पालकांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकानी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी तालुकाध्यक्ष प्रवीण खडपकर(७४९८४५७९५७) संपर्क करावा.

You cannot copy content of this page