वैभववाडी प्रतिनिधी
पंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकिसरे महालक्ष्मी मंदिर येथे कृषी मेळावा गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी शेतकऱ्यांना आंबा काजू नारळ व भात नागली पिकावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी भरसट,फोडा कृषी संशोधन केंद्राचे डॉ विजय शेटे, कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्रा फुटणकर,कोकिसरे सरपंच प्रकाश सुतार,आर्दश शेतकरी महेश संसारे,शेतकरी विलास देसाई, वैभववाडी तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राची तावडे कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, आदी मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकिसरे येथे तालुका कृषी मेळावा संपन्न…
