दशावतारी कलाकार यांना बळ देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी…

विशाल परब:ओटवणे येथे आयोजित दशावतार नाट्यप्रयोगाला दिली भेट..

⚡सावंतवाडी ता.०१-: दशावतारी कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. हि दशावतारी कला गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही अशीच टिकून राहील. यासाठी दशावतारी कलाकार प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले.दरम्यान

आतुरता ग्रुप ओटवणे यांच्या वतीने संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांनी कलाकारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कार्यक्रम प्रसंगी सरपंच दाजी गावकर, बाबाजी गावकर, उमेश गावकर, बाबल गावकर, प्रशांत बुरान, आण्णा मळेकर (बापू गावकर ), महेश चव्हाण, पंकज गावकर, सचिन गावकर, मिकी गावकर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page