पिंगुळीत मृणाल सावंत यांच्या नृत्यधारा अकॅडेमीचा शुभारंभ…

⚡कुडाळ ता.३०-: प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. शिक्षणाबरोबरच मुलांनी नृत्य गायन वादन अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात वाटचाल केली पाहिजे. आज कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने सुरू केलेली नृत्यधारा डान्स अकादमी चळवळ वृद्धीगत होत राहो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांनी नृत्यधारा डान्स अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी पिंगुळी येथे केले.


पिंगुळी येथील कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील श्री देव रवळनाथ सभागृह बालोद्यान येथे नृत्यधारा डान्स अकॅडमी आजपासून सुरू केली आहे. या अकॅडमीचा शुभारंभ पिगुळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रंगमंचाची देवता नटराजचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन हेमंत जाधव पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी भरतनाट्यमच्या संचालिका कविता राऊळ, संचालिका कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, अजय सावंत, प्रतीक्षा सावंत, रतन नादोसकर, गुरू देसाई, प्रशांत माने, गुरुनाथ पाटकर, सुशांत पिंगुळकर, नितीन शेबटकर, यशवंत बाबार्डेकर, गुणाजी जाधव, राकेश गावडे, साईप्रसाद चव्हाण, प्रमोद पालकर, नागेश नाईक, तुळशीदास पाटकर, सौ शिरोडकर, अनुष्का सावंत, ओंकार सावंत पालक विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
यावेळी बोलताना श्री जाधव म्हणाले पिंगुळी गाव सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर आहे. धार्मिक शैक्षणिक क्रीडा सर्व क्षेत्रात पिंगुळी गाव नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. विशेष म्हणजे कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने बालपणापासूनच त्या नृत्य क्षेत्रात वाटचाल करत आज त्यांनी केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सह टीव्ही चॅनल विविध नृत्य यातून आपल्या कलेतून नावलौकिक मिळवलेला आहे. तिने गावाबरोबरच जिल्ह्याचेही नाव रोशन केले आहे. आज ही अकॅडमी नृत्यधारा या नावाने सुरू केलेली आहे ही नृत्यधारा अशीच सदैव वृध्दीगत राहो अशा यावेळी शुभेच्छा दिल्या.
दीपक गावडे यांनी आज पिंगुळी गावात पिंगुळीची सूकन्या मृणालने नृत्यकलेचे क्लासेस सुरू करून एक मुहूर्तमेढ रोवली आहे. आपल्या कलेने तिने सगळीकडे नावलौकिक मिळवलेला आहे. आपल्या पिंगुळी गावात नृत्य क्लासेस सुरू व्हावे अशा प्रकारची आम्ही केलेल्या मागणीला अनुसरून तिने क्लासेस सुरू केलेले आहेत. भविष्यात तिच्या या क्लासेसला आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत. प्रास्ताविक अजय सावंत यांनी केले. तर सर्वाचे आभार मानताना पिंगुळी ग्रामपंचायतीने हा सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल नृत्यांगना मृणाल सावंत हिने आभार मानले.

You cannot copy content of this page