⚡सावंतवाडी ता.३०-: रोटरी वर्ष 2023-24 चा निरोप समारंभ निमित्त रोनापाल -मडूरे येथील “दयासागर छात्रालयया गरीब मुला-मुलींच्या वसतीगृहाला भेट देऊन मुलाना धान्य, पुस्तके देण्यात आली.
याप्रसंगी रो.विनया बाड यानी वसतीगृहातील मुलींना MHM या कार्यक्रमा अंतरगत – वयात येणाऱ्या मुलीना मार्गदर्शन केले आणि सॕनेट्रीपाॕडचे वाटप करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.सुहास सातोस्कर सचिव रो.प्रविण परब रो.विनया बाड आणि रो.दिलीप म्हापसेकर उपस्थित होते.
यावेळी सुंदर हस्ताक्षर आणि उत्तम चित्रकला काढणा-या देवेश गवस या मुलाचे अध्यक्ष रो.सुहास सातोस्कर यानी कौतुक केले.
