नुकसानग्रस्त शेतक-याला प्रभाकर सावंत यांच्याकडून आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.२९-: आडेली-गवळीवाडी येथे विद्युतभारीत वाहिनी पडून एक म्हैस मृत्यूमुखी पडली तर दुसरी म्हैस गंभीर जखमी झाली. यामुळे प्रशांत गवळी या गोरगरीब शेतक-यांवर आभाळ कोसळले. या घटनेची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तत्काळ श्री.गवळी यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत केली. तसेच पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून शासनस्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे अभिवचनही दिले.


यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, तात्या कोंडसकर, अयज डिचोलकर, रूपेश कानडे, तेर्सेबांबर्डे सरपंच रामचंद्र परब, पोलीस पाटील पांडुरंग आडेलकर, राजू सामंत, महेंद्र मेस्त्री, प्रकाश साटेलकर, राजेश गवळी, दत्ताराम गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page