केरवाडीत मनसेतर्फे वृक्षारोपण…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वटपौर्णिमेचे औचित्य साधून मनसेतर्फे केरवाडी-शिरोडा येथे नवीन झालेल्या बंधा-याच्या काठावर २५० झाडांचे लागवड करण्यात आली.

  वृक्ष जगले पाहिजेत, जंगलांचं अस्तित्व अभादित राहिले पाहिजे ह्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे उद्गार तालुका अध्यक्ष सनी बागकर ह्यांनी काढले. हा कार्यक्रम उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी केरवाडी शाखाध्यक्ष रोहित म्हाकले, आदित्य कुर्ले, कौशल मलबारी, सत्यविजय सारंग, दिगंबर सारंग, साहिल मलबारी, संदेश पडते, सर्वेश तांडेल, अंकुश खवणेकर आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page