मुंबई गोवा महामार्ग गणेश उत्सव पूर्वी तरी पूर्ण करा…

डाॅ जयेंद्र यांचा राणेंना टोला: राणेंना मंत्रिपद न देऊन भाजपने कोकणी जनतेचा केला अपमान…

⚡सावंतवाडी ता.२०-: गेले अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला मुंबई गोवा महामार्ग निदान गणेश चतुर्थीच्या पूर्वी तरी पूर्ण करण्यात यावा यासाठी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावेत. असा टोला उबाठा शिवसेना प्रवक्ते डाँ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान गेल्या अडीच वर्षात राणेंचा मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्याला अजिबात झालेला नाही त्यामुळे आता तरी जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प राणेंनी मार्गी लावावेत असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले राणेंना केंद्रात मंत्रिपद न दिल्याने एक प्रकारे भाजपने कोकणी जनतेचा अपमान केला नाही का..? असा सवाले श्री परुळेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
ज्या कोकणाने महायुतीला दोन दोन खासदार दिले त्यांना मंत्रीपद देऊन कोकणाचा सन्मान करायला हवा होता परंतु भाजपने एक प्रकारे कोकणी जनतेचा हा अपमानच केला आहे असे यावेळी बोलताना म्हणाले.दरम्यान ठाणे हे धनशक्तीच्या जीवावर निवडून आले आहेत अशी जिल्ह्यात सध्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.

You cannot copy content of this page