खासदार नारायण राणे:येत्या विंधनसभेला आमचेच सर्व आमदार..
⚡कुडाळ ता.१५-: या लोकसभा निवडणुकीत आपण कोकणातून शिवसेना संपवली असल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. आमच्या कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देवून आम्ही पुढे जावू,आडवे आले होते त्यांचा पाय आम्ही बाजुला केलेला आहे. आता कोकणात त्यांना बोटही शिरायला देणार नाही असा इशारा भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमचेच आमदार निवडून येतील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. कुडाळ येथे आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राणे यांनी मतदारांचे आणी विजयात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातली पाच कामे प्राधान्याने करणार असल्याचे खासदार राणे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर नूतन खासदार नारायण राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी कुडाळ येथील फिटलं कोकोनट मध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, राजू राऊळ, संदीप कुडतरकर,मनीष दळवी, अस्मिता बांदेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, रुपेश कानडे, पप्या तवटे, निलेश परब, राजेश पडते, सुनील बांदेकर विनायक राणे, निलेश सामंत आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुरवातीला खासदार नारायण राणे यांनी मतदार, कार्यकर्ते, पत्रकार, विरोधक या सर्वांचे आभार मानले. श्री. राणे म्हणाले की, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे. माझी उमेदवारी जाहिर झाल्यानंतर विरोधक माझ्यावर टिका करत होते. ते म्हणत होते की आता माझे काम हलके झाले. . पण आता समजले असेल कि कुणाचे काम कुणी हलके केले ते. आता त्यांच्यावर काही अधिक बोलायचे नाही. या लोकसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान मी फार संयमी राहिलो. त्याचा मला फायदाच झाला, तोटा झाला नाही. यावेळी आता मी ठरवले आहे रत्नागिरीसाठी कामे करायची. रत्नागिरीचे पाच प्रश्न मी हाती घेतले आहेत. त्यामध्ये नॅशनल हायवेचे काम पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. रत्नागिरीत पाणी, रोजगार, विमानतळ आणि चिपळुण मधील पुरपरिस्थिती हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
केंद्रिय मंत्री मंडळातील मंत्री पदाबाबत त्यांनी अधिक बोलणे टाळत हा प्रश्न वरिष्ठांचा असल्याचे राणे यांनी सांगत हा प्रश्न संपलेला नाही, पक्ष महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी निश्चितच निर्णय घेईल असे सांगितले. सिंधुदुर्गात उद्योग धंदे ,नोकरी यासाठी येत्या दोन वर्षात माझ्या प्रयत्नांना यश येईल.पर्यटानसाठी आवश्यक असणार्या गोष्टी, पर्यटकांना पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कोकणातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. उद्योग व्यवसायासाठी कमी दरात विज कशी उपलब्ध होईल त्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले
महायुतीत शिंदे शिवसेना आपण मोठे भाऊ असल्याबाबत सांगत आहेत.याबाबत खा. राणे म्हणाले की, महायुतीत प्रत्येकाने जबाबदारीने बोलल पाहिजे. इथे लहान मोठा कुणीच नाही. असे मला वाटत असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीवर्ल्ड व रत्नागिरी मधील रिफायनरी प्रकल्प मार्गी लागतील, चिपी विमानतळावर नविन रूट सुरू करण्याबाबत माझे बोलणे सुरू आहे. हे रूट सुरू झाल्यानंतर हा विमानतळ पुर्ण क्षमतेने सुरू होईल. असे श्री राणे म्हणाले
टाळंबा धरण प्रकल्पाबाबत आपण माहिती घेवून टाळंबा प्रकल्पात लक्ष घातला जाईल. टॉय ट्रेन प्रकल्प तयार आहे. तो प्रकल्पही कार्यान्वित होईल पण त्या प्रकल्पाला खर्च कुणी करायचा? हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात कमी मताधिक्य मिळाले तरी सुध्दा मी सर्वांचेच आभार मानले. माझे विरोधक आहेत त्यांना मी सांगु इच्छितो कि अजुन जरा प्रयत्न करा म्हणजे त्यांच्यापेक्षा माझे प्रयत्न वाढतील असे सांगत आपला रोख कुठे आहे हे मला ज्ञात आहे पण मी तिथं पर्यत जावु शकत नाही असे सांगुन रत्नागिरीतील विरोधकांचे नाव घेण्याचे टाळले.
मुस्लिमांच्या मतदानाबाबत खासदार राणे यांना प्रश्न विचारला असता म्हणाले की, कोकणातील मुसलमान आपले आहेत. मलाही मुस्लिमांनी मतदान केले आहे. . शिवसेना मात्र आयुष्यभर मुस्लिमांविरोधात आहे. मातोश्रीत मुस्लिम शब्दाला काय म्हणतात ते मला माहिती आहे. आता पर्यंत शिवसेनेने मुसलमानांना विरोध केला. आता शेवटी ते मिय्याभाई झाले. त्यांना आता उध्दव मिया म्हणतात असे सांगितले. . जरांगे पाटीलांच्या आंदोलनाबाबत खा. राणे यांनी बोलणे टाळत जे लोक जरांगे पाटलांना खतपाणी घालत होते ते आज अडचणीत आले आहेत. भुजबळांच्या खासदारकी उमेदवारीच्या बाबत प्रश्न विचारला असता नो कॉमेंट्स म्हणुन त्यांनी उत्तर देणे टाळले. कोकणरेल्वे तिकिट वेटींग कडे लक्ष वेधण्यात आले